Upsa Irrigation Work Agrowon
ॲग्रो विशेष

Krishna Upsa Irrigation : ‘कृष्णा उपसा सिंचन’चे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

Irrigation Scheme Work Stopped : जलवाहिनीमधून रामेश्वर आणि गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरातील आठ गावांच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे काम बंद पाडले.

Team Agrowon

Bhum News : कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइनचे काम भूम तालुक्यात चालू आहे. या योजनेंतर्गत जलवाहिनीमधून रामेश्वर आणि गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरातील आठ गावांच्या शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २५) एकत्र येऊन कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे काम बंद पाडले.

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेंतर्गत हिवर्डा तलाव ते सोनगिरी तलाव या उपसा सिंचन योजनेची जलवाहिनी वरुड, बऱ्हाणपूर, गोरमाळा, कासारी, कृष्णापूर, रामेश्वर, वरूड या भागातून जाते.

परंतु, या आठ गावांना रामेश्वर व गोरमाळा तलावात पाणी सोडले तर या आठ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर, गोरमाळा तलावात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील जाणाऱ्या जलवाहिनीमधून या दोन तलावांमध्ये पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी अन्यथा हे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

यावेळी अविनाश चोरमुले, आबा पिंगळे, बापू नलवडे, तात्यासाहेब दराडे, अतुल शेळके, अमोल अवताडे, सुभाष अवताडे, सतीश वारे, तानाजी पाटील, प्रल्हाद वनवे, गोरख उगलमुगले, श्रीकांत सानप यांच्यासह या भागातील शेतकरी उपस्थित होते.

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या जलवाहिनीमधून रामेश्वर, गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरतूद करावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. परंतु, अद्यापही आमची मागणी मान्य न केल्यामुळे आम्ही शेतकरी मिळून हे जलवाहिनीचे काम आज बंद पाडले.
तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना.
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेची कामे जलदगतीने सुरू राहण्याकरिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. आम्ही गोरमाळा व रामेश्वर या तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर या तलावामध्ये पाणी सोडणे शक्य होणार आहे.
प्रवीण चवरे, कार्यकारी अभियंता, उपसा विभाग, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT