Flowers Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : शेतकऱ्यांनी फळबाग, फुलशेतीकडे वळावे

शेतकऱ्यांनी भात शेतीवर विसंबून न राहता फळबाग व फुलशेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले.

Team Agrowon

अंबरनाथ : शेतकऱ्यांनी भात शेतीवर (Paddy Farming) विसंबून न राहता फळबाग (Horticulture) व फुलशेतीकडे (Flower Farming) वळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले. राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान व भात क्षेत्रामध्ये कडधान्य योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक योजनेत आमदार कथोरे यांच्या हस्ते आंबेशिवला हरभरा, मसूर व मोहरी बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी हे आवाहन केले.

पिके घेण्याबरोबरच मोगरा, फणस, शेवगा यांची लागवड यावर भर देऊन शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे भर द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी आंबा पीक विमा काढून नैसर्गिक आपत्तीपासून विमा संरक्षण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

भात पीक काढणी अंतिम टप्प्यात असून रब्बी हंगाम पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित हरभरा, मसूर, मोहरी बियाणे वाटप करण्यात येत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

हरभरा बियाणे घडीपत्रिका विमोचन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रयोगशील शेतकरी व अधिक भात उत्पादन केलेले शेतकरी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महत्त्‍वाकांक्षी किसान क्रेडिट कार्ड योजनेतील कार्डवाटपाची सुरुवात आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

उल्हासनगर तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी किसान क्रेडिट कार्डबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी हरभरा लागवड, हरभरा शेंडे खुडणे, खत व पाणी व्यवस्थापन करून हरभरा पिकाच्‍या उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. सरकारमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या हरभरा, मसूर बियाणे उत्पादनवाढीसाठी उपयोग करून घ्यावा व उत्पन्नात वाढ करून घेण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT