Farmer Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Scheme : शेतकऱ्यांनी ‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्यावा

Salokha Yojana : सलोखा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमीन अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क प्रत्येकी एक हजार रुपये आकारणी केली जात आहे.

Team Agrowon

Parbhani News : सलोखा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमीन अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क प्रत्येकी एक हजार रुपये आकारणी केली जात आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अधिक रक्कम न आकारता अगदी नाममात्र शुल्कामध्ये ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमधील वाद वाढीस न लागता त्यांच्यामध्ये संवाद, सौख्य आणि सौहार्द वाढीस लागावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही अधिकची रक्कम मोजण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी आपापसांत वाद न वाढवता या प्रक्रियेचा लाभ घेऊन आपापल्या जमिनी कोणताही तंटा न करता नावावर करू घ्याव्यात.

योजनेची अधिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. गावच्या तलाठ्याकडे साध्या कागदावर देणार-घेणार यांनी एकत्रित अर्ज करावा.

अर्जानुसार तलाठी व मंडळ अधिकारी १५ दिवसांच्या आत जायमोक्यावर स्थळ पाहणीसाठी येतील. स्थळ पाहणीत अदलाबदल होणाऱ्या शेताच्या चतु:सीमा धारक यांच्याशी १२ वर्षांपासून ताब्याबाबत चर्चा करून सत्य असल्यास तसा पंचनामा करतील.

१२ वर्षांपासून ताबा असल्याबाबतचा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या दोघांच्या स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देतील. प्रमाणपत्राची प्रत जोडून तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रत्येक शेतकरी प्रत्येकी एक हजार रुपये भरून जमिनीच्या अदलाबदलीचे दस्त तयार करतील.

दस्त नोंदणीची छायांकित प्रत तलाठी कार्यालयात दाखल करून फेरफार करून नवीन ७/१२ मिळतील. अदलाबदल करावयाची जमीन ही एकाच गावातील असावी. ती जमीन वेगवेगळ्या गटात असेल तरीही चालेल. मागील १२ वर्षांपासून ताबा असला पाहिजे. अदलाबदल करण्यासाठी दोघांची संमती असली पाहिजे.

या दोघांपैकी एक सहमत नसल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत ही योजना लागू आहे. केवळ शेत जमिनीचे अदला-बदल करता येईल. अकृषिक प्लॉट, वाणिज्य क्षेत्र यासाठी योजना लागू नाही. अदला - बदल होणाऱ्या क्षेत्रामध्ये फरक (द्यायचे क्षेत्र कमी व घ्यायचे क्षेत्र जास्त) असेल तरीही योजनेचा फायदा घेता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT