Kolhapur Agriculture agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Agriculture : शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे; कृषी विभागाकडून आवाहन

Agristack : ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक देण्यासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करुन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी १५ मे २०२५ पर्यंत करून घ्या, अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केल्या.

Team Agrowon

Farmers ID : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी तसेच १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिके, शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला आहे. ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक देण्यासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करुन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी १५ मे २०२५ पर्यंत करून घ्या, अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केल्या.

ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, तसेच तालुकास्तरावर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान किसान योजनेतील ६ लाख ३ हजार शेतकऱ्यांपैकी ३ लाख ४५ हजार ३०५ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक क्रमांक घेतला आहे. त्यामुळे याचे ५७.२६ टक्के काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान किसान योजनेतील जे अक्रियाशील (इनॲक्टिव्ह) शेतकरी आहेत, त्या पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक क्रमांक महत्त्वाचा आहे.

मृत शेतकरी आढळल्यास त्यांच्या वारसांची नोंदणी करा. पंतप्रधान किसान योजनेतील उर्वरित २ लाख ५७ हजार ७२३ शेतकऱ्यांची नोंदणी दहा दिवसांत पूर्ण करा. तसेच कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार ५५० शेतकऱ्यांपैकी ४ लाख ११ हजार ४६४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. येत्या १५ दिवसांत ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना डॉ. खिलारी यांनी केल्या. सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढून घेण्यासाठी केलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाबाबत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT