Kolhapur Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे

Rabi Season 2024 : रब्बीमध्ये पिकांच्या उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nanded News : रब्बीमध्ये पिकांच्या उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. या पिकस्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

रब्बी हंगाम २०२४ मध्येही पीक स्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीक स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा करडई व जवस अशा पाच पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल, पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थींच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील ३१ डिसेंबर आहे.

तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहेत. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस

तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस पाच हजार, दुसरे तीन हजार तर तिसरे दोन हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस दहा हजार, दुसरे सात हजार तर तिसरे पाच हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस ५० हजार, दुसरे ४० हजार तर तिसरे ३० हजार याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT