Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Based Business : शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे

Agriculture News L जिल्ह्यातील जमीन, वातावरण हे फलोत्पादनाला पोषक आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांसोबतच पूरक व्यवसाय, फळबागांकडे शेतकऱ्यांनी वळावे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील जमीन, वातावरण हे फलोत्पादनाला पोषक आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांसोबतच पूरक व्यवसाय, फळबागांकडे शेतकऱ्यांनी वळावे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.

जळगाव जामोद येथे केव्हीके, कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सव व प्रदर्शन उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

श्री. ढगे म्हणाले, की राज्यात काही भागात जमीनधारणा कमी असूनही तेथील शेतकरीपूरक व्यवसायांच्या जोरावर चांगले अर्थकारण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याकडे तर तुलनेने जमीनधारणा अधिक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृष्णराव इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, बुलडाणा केव्हीकेचे प्रमुख डॉ. अनिल तारू,

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विकास जाधव, पंदेकृविचे सहयोगी प्रा. डॉ. उज्ज्वल राऊत, बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, शास्त्रज्ञ अनिल गाभणे, संजय उमाळे आणि विनोद जानोतकर यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. जाधव, कृष्णराव इंगळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीकेचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ शशांक दाते यांनी केले.

तांत्रिक मार्गदर्शन

या कार्यक्रमात ‘पंदेकृवि’चे शास्त्रज्ञ डॉ. राऊत यांनी सीताफळ छाटणी तंत्रज्ञान, त्यानंतर परागीकरणाचे महत्त्व आणि अन्न द्रव्य वस्थापनबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर विलास गायकवाड यांनी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या विविध सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाशीम जिल्ह्यातील कंपनीचे कार्य मांडले. व्यापार व्यवस्थापनामध्ये शेतकरी कंपनीचे महत्त्व विस्ताराने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT