Grain Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Producer : शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादक बनावे

Seed Production : शेतकऱ्यांनी आता काळाची गरज ओळखत केवळ धान्य उत्पादक न राहता बियाणे उत्पादकही बनावे.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांनी आता काळाची गरज ओळखत केवळ धान्य उत्पादक न राहता बियाणे उत्पादकही बनावे. जेणेकरून आपल्या शेतमालाला अधिक भाव मिळेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन अकोला आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

तेल्हारा तालुका कृषी विभागाच्या पुढाकाराने आयोजित धान्य महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. या महोत्सवात १३० क्विंटल बियाणे विक्री झाले असून ६२४ क्विंटल बियाण्याची नोंदणी शेतकऱ्यांनी केली. या बियाणे महोत्सवामधून सुमारे ५२ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे.

कार्यक्रमाला तहसीलदार समाधान सोनवणे, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, मंडळ कृषी अधिकारी रंजना देशमुख, गजानन नागे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बियाणे महोत्सवात तालुक्यातील एकूण ३५ शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मूग या घरगुती उत्पादित बियाणे विक्रीचे स्टॉल लावले होते. शेतकऱ्यांनी विविध स्टॉलला भेट देऊन बियाणे खरेदी व नोंदणी केली. शेतकऱ्यांना उगवण शक्तीचे प्रात्यक्षिक व बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रास्ताविकात गौरव राऊत यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्याचे उच्च दर व कमी उपलब्धता यामुळे खर्च वाढू शकतो, असे सांगितले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावे, असे आवाहन केले. तहसीलदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात घरगुती बियाणे पेरण्याविषयी सांगितले.

शेतकरी प्रतिनिधी दिनकर ढोले यांनी हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सारभूकन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

 ५२ लाखांची उलाढाल

या महोत्सवामध्ये एकूण १३० क्विंटल बियाणे विक्री झाले. शेतकऱ्यांकडे ६२४ क्विंटल बियाण्याची बुकिंग करण्यात आली. या बियाणे महोत्सवामधून अंदाजे ५२ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT