Urea  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Fertilizer : शेतकऱ्यांनी युरियाचा अनावश्यक वापर टाळावा

Agriculture Officer Ganesh Shrikhande : शक्यतो पेरणीवेळी मिश्रखते, संयुक्त खते वापरावीत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले.

Team Agrowon

Solapur News : रासायनिक खते वापरताना माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा. पेरणीवेळी फक्त युरियाच काही शेतकरी अजूनही वापरतात, त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कारण पेरणीवेळी वापरलेला युरिया बहुतांशवेळा जमिनीत वाया जातो. त्यामुळे शक्यतो पेरणीवेळी मिश्रखते, संयुक्त खते वापरावीत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले.

मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठक नुकतीच झाली. याप्रसंगी श्रीखंडे बोलत होते. गटविकास अधिकारी योगेश कदम, तंत्र अधिकारी आश्‍विनी शिंत्रे, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र भांगे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबर, विस्तार अधिकारी मधुकिरण डोरले, कृषी पर्यवेक्षक प्रशांत काटे या वेळी उपस्थित होते.

श्रीखंडे म्हणाले, खत विक्रेत्यांनी दर्जेदार बियाणे उपलब्ध करावेत, तसेच हुमणी नियंत्रणासाठी कृषी सहायक यांनी गावनिहाय मोहीम राबवावी, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे वापरावेत. मेटारायझिम, जैविक हुमणी नियंत्रणासाठी वापरावे, यासाठी प्रचार व प्रसिद्धी करावी, असे आवाहनही केले. या वेळी त्यांनी कृषी विभागाचा हंगामासाठी तयार केलेला आराखडा आणि त्यात खताच गरड, उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली.

गटविकास अधिकारी कदम यांनी खत-बियाणे विक्रेत्यांनी दर फलक तसेच उपलब्ध खते याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावेत, असे आवाहन केले. श्री. काटे यांनी पेरणीवेळी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे, यासाठी खत विक्रेते यांनी अॅझोटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर, पी.एस.बी, पोटॅश मोबिलायझर, ट्रायकोडर्मा, जिवाणू खते यांच्या वापराबाबत माहिती दिली.

तसेच नेमकी बीजप्रक्रिया कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी पीकस्पर्धेतील तालुकास्तरीय विजेते शेतकरी शौकत बादशाह सुतार, विठ्ठल शंकर माने, गोविंद राजाराम शिंदे, दत्तात्रय बाबा जगताप यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर यांनी केले. सूत्रसंचलन प्रशांत काटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT