Jalna News : शेतकऱ्यांनी कुठल्याही एका पिकावर अवलंबून न राहता एकात्मिक शेती पद्धतीची कास धरण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. श्रीकृष्ण सोनुने यांनी केले.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्यावतीने मासिक चर्चासत्र मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे शुक्रवारी ( ता. ९ ) शंकर पवार यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनुने बोलत होते.
ते म्हणाले, की फळ पीक तथा रेशीम शेतीसह मुग, उडीद, जवस, मटकी यासारख्या पोषण मूल्य असलेल्या कडधान्य व भरड धान्यालाही चांगले दिवस आले आहेत. शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीवरही आता भर देण्याची गरज आहे. जमीन सुपिकतेसह मानवी आरोग्यासाठी कडधान्य पिकाची लागवड महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही ते म्हणाले.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे-पाटील यांनी आपले अनुभव सांगितले. अकोला देव येथील सुधीर जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आयोजक शंकर चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. यावेळी झालेल्या शिवारफेरीत आत्माराम पिठोरे, अक्षय राठोड, सुरेश राठोड, शिवराज पवार, राजेश रायमुले, राजेश पवार, प्रदीप पवार, बाळासाहेब तोटे,
दत्तात्रय रायमुले, दिगंबर चव्हाण, ज्ञानदेव आहिरे, लक्ष्मण राठोड, लक्ष्मण पवार, विजय पवार, सतीश चव्हाण, कृष्णा राठोड, गोपाल चव्हाण, वैभव बागल, नामदेव माथने, शंकर पवार, दिलीप चव्हाण, अशोक पवार, विशाल चव्हाण, गणेश राठोड, संतोष चव्हाण, गजानन राठोड, सखाराम पवार, पशुपाद चव्हाण, राहुल पवार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.