Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पोस्टाने पाठविले कांदे

नगरसह राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी गावोगावी आंदोलन करीत आहेत. कांदा उत्पादकांना केंद्र व राज्य सरकार फारसे महत्त्व देताना दिसत नाही.

Team Agrowon

Nagar Onion Rate : कांदा मातीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी नगरच्या काही संतप्त शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनाच पोस्टाद्वारे कांद्याची भेट पाठविली आहे.

नगरसह राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी गावोगावी आंदोलन करीत आहेत. कांदा उत्पादकांना केंद्र व राज्य सरकार फारसे महत्त्व देताना दिसत नाही.

त्यामुळे कांदा उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने दोन दिवसांपूर्वी होळीनिमित्त काही शेतकऱ्यांनी थेट कांद्याचीच होळी करून सरकारच्या निर्यात धोरणाचा निषेध केला.

काही शेतकरी येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांनी कांद्याच्या थैल्या करून पंतप्रधान मोदी यांच्या दिल्ली येथील कार्यालयाचा पत्ता चिटकवून त्या पाठविल्या. आंदोलनात बच्चू मोढवे, शिवराज कापरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

अनुदान देण्याची मागणी

कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान दिले पाहिजे. ते जमत नसेल रोटाव्हेटर घेण्यासाठी मदत दिली पाहिजे, अशी या शेतकऱ्यांची मागणी होती.

या वेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला. राज्यभर आंदोलने सुरू असतानाही मोदी सरकार त्याची दखल घेत नाही, उलट आंदोलने दाबली जात असल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT