Farmer Training Agrowon
ॲग्रो विशेष

Mamach Wavar : 'मामाचं वावर'मध्ये शेतकरी-शास्त्रज्ञ संवादातून नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार

Agriculture Growth : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे व शेतीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे नोव्हेंबर २०२२ पासून शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा दर महिन्यात आयोजित केली जाते

Team Agrowon

Buldana News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एप्रिल महिन्याची सभा गुरुवारी (ता. २४) वळती (ता. चिखली ) येथे ‘मामाचं वावर’ या ठिकाणी झाली. =

या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग जिल्हा संसाधन व्यक्ती रवितेज जाधव उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे शिक्षण विस्तार विभागाचे विशेषज्ञ डॉ. जगदीश वाडकर, कृषी हवामान तज्ञ मनेश यदुलवार, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विजय भुतेकर व सचिव सर्जेराव पाटील उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे व शेतीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे नोव्हेंबर २०२२ पासून शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा दर महिन्यात आयोजित केली जाते व शेतकरी-शास्त्रज्ञ यांच्यात सुसंवाद साधला जातो. याचाच एक भाग म्हणून वळती येथील शेतकरी मोहन तेजराव जगताप यांचे कृषी पर्यटन केंद्र ‘मामाचं वावर’ येथे आजची सभा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी श्री. जाधव शेतकऱ्यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली. हे उद्योग उभारणीसाठीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली व या उद्योगासाठी बँकेच्या वित्तसहाय्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

श्री. यदुलवार यांनी आगामी मॉन्सूनचा दीर्घावधी अंदाज शेतकऱ्यांना सांगितला व त्यानुसार पिकाचे योग्य नियोजन करावे असे आवाहन केले. त्यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये भाजीपाला पिकाविषयी साधक बाधक चर्चा झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वाडकर यांनी करीत आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT