Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : गडचिरोलीतील ६१ टक्‍के शेतकऱ्यांकडून पीककर्जाचा भरणा

Agriculture Loan : खरीप तसेच रब्बी हंगामात लागवड काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते. त्यासाठी शेतकरी बॅंकेच्या कर्जाचा पर्याय निवडतात.

Team Agrowon

Gadchiroli News : पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीककर्ज भरण्याची लगबग वाढली आहे. खरीप तसेच रब्बी हंगामात लागवड काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते. त्यासाठी शेतकरी बॅंकेच्या कर्जाचा पर्याय निवडतात. सरकारमार्फत शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शून्य टक्‍के व्याज दराने पुरवठा केला जातो.

मात्र त्यासाठी शेतकऱ्याने पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करणे आवश्‍यक आहे. पीककर्जाचा पैसा जवळपास ९ महिने कालावधीपर्यंत वापरता येत असल्याने पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण तसेच जिल्हा बॅंक शाखांच्या माध्यमातून कर्जाचे वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा बॅंकेमार्फत होते.

खरिपातील धान नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यापासून शेतकरी दराचा अंदाज घेत धानाची विक्री करतात. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचा कर्ज भरणा करण्यावर भर राहतो. त्यानुसार १७ मार्चपर्यंत जिल्हा बॅंकेत सुमारे ६१.६४ टक्‍के कर्जाची परतफेड करण्यात आली आहे.

३१ मार्चपर्यंत ९५ टक्‍केपेक्षा अधिक कर्जवसुली होईल, असा विश्‍वास बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी व्यक्‍त केला आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेने खरिपात सुमारे ११६ कोटी ९२ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले होते. त्यापैकी १४ हजार ४६ शेतकरी सभासदांकडून ७२.०७ कोटी रुपयांच्या कर्जाचा भरणा आतापर्यंत केला गेला आहे.

याची टक्‍केवारी ६१.६४ इतकी असल्याचेही बॅंकेकडून सांगण्यात आले. जिल्हयात सर्वाधीक ३३.४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप चामोर्शी तालुक्‍यात करण्यात आले होती. यातील २१.०२ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला असून टक्‍केवारी ६२.७६ इतकी आहे. एप्रिलमध्ये उचलेले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. त्यामुळे जवळपास १० ते ११ महिने बिनव्याजी पैशाचा वापर करणे शक्‍य होते. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्ज घेत नियमितपणे भरणा करतात.

अशी आहे तालुकानिहाय्य वाटप (चौकटीत वसुली) कोटी रुपयांत

कोरची ५.९५ (३.७०)

कुरखेडा १५.४२ (८.९०)

देसाईगंज ४.३६ (२.९१)

आरमोरी १२.९२ (८.२०)

गडचिरोली १०.४६ (७.२०)

धानोरा ९.६६ (६.२०)

चामोर्शी ३३.४९ (२१.०२)

अहेरी ८.३३ (४.४०)

मुलचेरा ४.१४ (२.१२)

भामरागड २.१८ (१.४१)

एटापल्ली ४.६९ (२.८१)

सिरोंचा ५.३२ (३.२०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT