Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

DAP Fertilizers: 'डीएपी’ खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव

Agriculture Department: राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यायी व समतोल खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यात खरीप पेरण्यांना सुरुवात झाली असून, ‘डीएपी’साठी (डायअमोनियम फॉस्फेट) शेतकऱ्यांची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे डीएपीला पर्याय असलेली खते शेतकऱ्यांनी वापरावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चालू खरिपासाठी साधारणतः १५.५२ लाख टन युरिया, ४.६० लाख टन डीएपी (डायअमोनियम फॉस्फेट), १.२० लाख टन एमओपी, ७.५० लाख टन एसएसपी आणि १८ लाख टनाच्या आसपास संयुक्त खतांचा पुरवठा होणार आहे. गेल्या ३-४ वर्षांमधील खरीप हंगामात वापरल्या गेलेल्या एकूण खतांपेक्षाही यंदा डीएपीचा मंजूर पुरवठा जास्त आहे. त्यामुळे डीएपीची टंचाई भासणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्राकडे यंदा राज्याने पाच लाख टन डीएपीची मागणी केली होती. मात्र मंजुरी ४.६० लाख टनाला मिळाली आहे. मात्र गेल्या खरिपात डीएपीचा वापर चार लाख टनाच्या आसपास झाला होता. यंदादेखील पुरवठा पुरेसा होईल. राज्यात सध्या खरीप पेरा सुरू झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ‘डीएपी’ला मागणी असल्याचे दिसून येते.

डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद अशी दोन अन्नद्रव्य आहेत. मात्र केवळ एका श्रेणीतूनच डीएपी मिळतो असे नाही. डीएपीच्या एका गोणीऐवजी जर ‘युरिया’ची अर्धी गोणी व ‘एसएसपी’च्या तीन गोणी खतांचा वापर केल्यास डीएपीला चांगला पर्याय मिळतो. तसेच, टीएसपी (ट्रीपल सुपर फॉस्फेट) खतात देखील ४६ टक्के स्फुरद आहे. त्यामुळे डीएपी खताच्या एका गोणीऐवजी ‘युरिया’ची अर्धी गोणी व ‘टीएसपी’ एक गोणी वापरल्यास डीएपीला उत्तम पर्याय उपलब्ध होतो.

स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर ‘एसएसपी’ला (सिंगल सुफर फॉस्फेट) सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी देशांतर्गत तयार होते. यामध्ये १६ टक्के स्फुरदसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. एसएसपीमधील सल्फर हे अन्नद्रव्य तेलबिया पिकांसाठी फायदेशीर असते. परंतु एसएसपीबरोबरच एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६ व एनपीके १५:१५:१५ या श्रेणीदेखील महत्त्वाच्या आहेत. या श्रेणींच्या वापरामुळे नत्र व स्फुरदाबरोबरच पालाशसुध्दा पिकांना उपलब्ध होते. संयुक्त खत वापरातून पिकांचे चांगले पोषण होते, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

‘एका श्रेणीवर अवलंबून राहू नये

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापरात राज्य अग्रेसर आहे. माती परीक्षण व मृदा आरोग्य पत्रिकांचे आधारेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते. त्यामुळे चालू खरिपात शेतकऱ्यांनी चांगल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी केवळ डीएपीकरिता केवळ एका श्रेणीवर अवलंबून राहू नये. त्याऐवजी बाजारपेठेतील उपलब्ध पर्यायी खतांचा समतोल वापर करावा, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT