Agriculture Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Day-Time Electricity : अकोल्यातील ८८०० शेतकऱ्यांना आता दिवसा वीजपुरवठा

Solar Project : ख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ३१ मेगावॉट क्षमता असलेले एकूण नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ३१ मेगावॉट क्षमता असलेले एकूण नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. हे सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे परिसरातील ८ हजार ८०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला सुरुवात झाली आहे.

परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा, अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ४३ उपकेंद्रासाठी विकेंद्रित सौर प्रकल्पातून २०४ मेगावॉट वीज निर्मित करण्यात येत आहे.

तथापि, जिल्ह्यात काही कालावधीतच बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद तीन, रेडवा दोन, मूर्तिजापूर तालुक्यातील माना दोन, पातूर तालुक्यातील पांगरा तीन, चान्नी पाच, टाकळी निमकर्दा चार, माझोड पाच, कवठा खुर्द तीन, वांगरगाव चार मेगावॉटचे नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यातील आठ हजार आठशे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे या प्रकल्पातून ३१ मेगावॉट वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT