Power Supply Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Power Supply Crisis : तीन महिन्यांपासून शेतीसाठी अवघा पाच तास वीजपुरवठा

Agriculture Electricity : यावर्षी मुबलक पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस, केळी यांसारखी बागायती पिके मोठ्या प्रमाणात केली आहेत. मात्र पाणी असूनही वीज वितरणच्या कमी वीजपुरवठ्यामुळे येथील शेतकरी हैराण झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : पोथरे (ता. करमाळा) येथे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा अवघा पाच तास केला जात असून, तोही अत्यंत कमी दाबाने होत आहे. त्यामुळे अतोनात कष्ट करून जगवलेली पिके जळू लागली आहेत. वीज वितरण विभागाने दोन दिवसांत याकडे लक्ष घातले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

यावर्षी मुबलक पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस, केळी यांसारखी बागायती पिके मोठ्या प्रमाणात केली आहेत. मात्र पाणी असूनही वीज वितरणच्या कमी वीजपुरवठ्यामुळे येथील शेतकरी हैराण झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पोथरे येथील वीजपुरवठा भारनियमनाच्या नावाखाली अवघा पाच तास दिला जात आहे.

शिवाय, हा पुरवठाही कमी दाबाने मिळत आहे. त्यामुळे या पाच तास वीज पुरवठ्यातही कधी सबस्टेशनवरून वीज जाते तर कधी डीपी ट्रिप होतो. या सर्व परिस्थितीत वीजपुरवठा प्रत्यक्षात पाच तासांवरून तीन ते चार तास होत आहे.

त्यामुळे येथील हातातोंडाशी आलेली पिके पाणी असूनही जळू लागली आहेत. वीज वितरण विभागाने पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

तीन महिने झाले भारनियमनाच्या नावाखाली वीज कमी दाबाने दिली जात आहे. कधी कधी तर रात्रभर वीज नसते. हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. दोन दिवसांत वीजपुरवठा आठ तास झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- सोपान शिंदे, शेतकरी, पोथरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT