Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात

Crop insurance Compensation : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार निवेदने दिली गेली, तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्या

Team Agrowon

Ahilyanagar News : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळत नाही. याबाबत तातडीने दखल घेऊन पीकविम्याची शेतकऱ्यांना रखडलेली रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळू लागले आहेत. स्वाभामीने शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी ही माहिती दिली.

बाळासाहेब फटांगडे यांनी सांगितले की, २०२३-२४ या वर्षातील पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावा, तसेच केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही.

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार निवेदने दिली गेली, तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांवर एकामागोमाग एक संकटे येत आहेत.

अशा वेळी सरकारने सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ त्वरित लागू करणे गरजेचे आहे. जर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, असा इशारा रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, प्रशांत भराट, अमोल देवढे, मच्छिंद्र आर्ले, दादासाहेब पाचरणे, नानासाहेब कातकडे, हरिभाऊ कबड्डी, विकास साबळे, नारायण पायगण, मच्छिंद्र डाके, अंबादास भागवत आदींनी दिला होता.

अखेर स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळू लागले असून सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT