Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : मंत्री झिरवाळ यांच्या घरासमोर संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

Loan Recovery : दिंडोरी तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २) सकाळी नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा बँकेने सक्तीची कर्जवसुली व जमीन जप्ती तत्काळ थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनारे (ता. दिंडोरी) येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. या वेळी मागण्यांचे निवेदन दिले.

दिंडोरी तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २) सकाळी नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले.

बँकेच्या जाचक शंभर दिवसांच्या शेतजमीन सोसायटीच्या नावे किंवा बँकेच्या नावे करणे या वसुली धोरणाविरोधात शेतकरी जिल्हा बँकेने सुरू केलेली जाचक कर्जवसुली त्वरित थांबवून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सात-बारावर कब्जेदार सदरी लावलेल्या सोसायटीच्या व बँकेच्या नावांच्या नोंदी त्वरित रद्द कराव्यात,

या संदर्भात बँकेने वसुलीप्रक्रिया करताना सहकार कायद्यातील तरतुदींचा भंग केलेला आहे. शासनस्तरावर जटील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेला आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी करून झिरवाळ यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री झिरवाळ म्हणाले, की मी या प्रश्नाबाबात दोन-तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे व शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभा असल्याचे सांगत, जिल्हा बँकेच्या प्रश्नाबाबत जिल्ह्यातील तीनही मंत्री, सर्व आमदार, खासदार, शेतकरी नेते यांची मुंबई येथे बैठक बोलावून मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Power Tiller Care: पॉवर टिलरची देखभाल कशी करावी?

Kannad Naksha Project: कन्नड नक्शा प्रकल्पाचे काम पूर्ण

Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी

Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर

SCROLL FOR NEXT