Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास इगतपुरीत विरोध

Agriculture Land For MIDC : तालुक्यात मध्य रेल्वे, समृद्धी महामार्ग, विविध धरण प्रकल्प, डिझेल-पेट्रोल वाहिनी, राष्ट्रीय महामार्ग, वीज कंपनी, संरक्षण विभाग अशा विविध प्रकल्पांसाठी शासनाने ८० टक्के जमिनी संपादित केल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : तालुक्यातील आडवण व पारदेवी येथील वडीलोपार्जीत शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. जमीन संपादित करू नये यासाठी माजी आमदार पांडुरंग गांगड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. ७) शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले.

शासनाने तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकन्यांना भुमिहीन करण्याचे काम केले आहे, असा आरोप माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी केला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांनी, या आधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असताना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट घालत आहे.

जर शेतकरी भुमिहीन झाला तर नागरिक कंपन्या खातील का? असा सवाल उपस्थित केला. तालुक्यात मध्य रेल्वे, समृद्धी महामार्ग, विविध धरण प्रकल्प, डिझेल-पेट्रोल वाहिनी, राष्ट्रीय महामार्ग, वीज कंपनी, संरक्षण विभाग अशा विविध प्रकल्पांसाठी शासनाने ८० टक्के जमिनी संपादित केल्या आहेत.

आता तरी शेतकऱ्यांना भुमिहीन करू नका, अन्यथा शेतकरी संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरू केले जाईल, असा झशारा शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांनी दिला. तहसीलवर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे, उपाध्यक्ष विष्णू कोकणे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT