Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Farmer Protest: कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे काळाराम मंदिरासमोर आंदोलन

Loan Waiver Demand: जिल्हा बँकेच्या कर्जवसुली विरोधात शेतकरी संघटनांनी नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर आंदोलन करत सीतामातेला साकडे घातले.

मुकूंद पिंगळे

Nashik News: जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्जवसुली थांबवून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी (ता.६) काळाराम मंदिरात सीतामातेला साकडे घातले. ‘‘श्रीरामाच्या नावाने सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांवरची कारवाई थांबवावी,’’ अशी हाक आंदोलक शेतकऱ्यांनी सीतामातेला दिली.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ११ एप्रिल रोजी जिल्हा बँकेला वसुली स्थगितीचे निर्देश दिले असतानाही शेतकऱ्यांची नावे जाहीर करणे आणि जमिनींचे लिलाव सुरूच आहेत. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी मंदिर प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. ‘सातबारा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

जिल्ह्यात ५६ हजार शेतकऱ्यांवर कर्जवसुलीची कारवाई सुरू आहे. यातील एक हजार १०० शेतकऱ्यांच्या जमिनींवर बँकांची नावे लागली असून, १४ ते १५ हजार शेतकऱ्यांची नावे लावण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. ही वसुली थांबविण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे, कैलास बोरसे, दनाजी अहिरे, दिलीप पाटील, रामदास राऊत, जयवंत राऊत, एकनाथ ठाकरे, सोमनाथ जगताप, ताराबाई ठाकरे, पांडुरंग ठाकरे, धनराज ठाकरे, रामचंद्र गायकवाड, काशिनाथ बागूल, मुरलीधर ठाकरे, तुळशीराम ठाकरे, रवींद्र ठाकरे, कांतिलाल ठाकरे, पांडुरंग जगताप, मुरलीधर ठाकरे, गंगाधर शिंदे, सोमनाथ शहाणे, सचिन शेरकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT