Farmer Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: कर्जमाफी, रखडलेला पीकविमा, हुमणी नुकसान भरपाईसाठी मागणी

Crop Insurance: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २८) एकत्र येत अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवले.

Team Agrowon

Buldhana News: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २८) एकत्र येत अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवले. 

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, २०२३-२४ चा उर्वरित पीकविमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आजवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. मात्र अजूनही हजारो शेतकरी पीकविमा मिळण्यापासून वंचित आहेत.

त्या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा वितरित करावा. मागील वर्षी २०२४ ला संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके खराब झाल्याने शासनाने मदत सुद्धा जाहीर केली.

मात्र, अजूनही काही शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. मदत तत्काळ जमा करावी,  तसेच यावर्षी हुमणी अळीने हजारो हेक्टर जमिनीवरचे पिके उद्धवस्त केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ही बाब शासनाने लक्षात घेऊन पंचनाने करावेत व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.  अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार पवन पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.  

याप्रसंगी तालुक्यातील शिवदास खिरोडकार,अनिलसिंह राजपूत, सदाशिव गवई, समाधान गवई, भाऊजी पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, सोपान पाटील यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT