Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : वादळी पावसाने केळीची हानी; नुकसानीचे पंचनामे सुरूच

Heavy Rain Crop Loss : खानदेशात बुधवारी (ता. ११) रात्री झालेल्या वादळात केळीची सुमारे पाच हजार हेक्टरवर हानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले असून, चार हजार हेक्टरपेक्षा अधिक केळीच्या क्षेत्राला वादळाचा फटका बसला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बुधवारी (ता. ११) रात्री झालेल्या वादळात केळीची सुमारे पाच हजार हेक्टरवर हानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले असून, चार हजार हेक्टरपेक्षा अधिक केळीच्या क्षेत्राला वादळाचा फटका बसला.

अनेक भागांत केळी जमीनदोस्त झाली आहे. जळगाव, एरंडोल, जामनेर, पाचोरा, चोपडा, भडगाव आदी भागांत केळीची हानी झाली. तसेच मोसंबी, लिंबाच्या बागांनाही फटका बसला आहे. गिरणा नदीच्या क्षेत्रात अधिकची हानी वादळात झाल्याचे दिसत आहे. पंचनामे गुरुवारी (ता. १२) अनेक भागात सुरू झाले. सर्वत्र पीकहानीची माहिती तातडीने घेण्यात आली. धुळे व नंदुरबारमध्येही केळीची काहीशी हानी वादळी पावसात झाली आहे.

जळगाव तालुक्यातील अनेक गावांत निसवणीच्या अवस्थेतील केळी बागांची पाने फाटली. वादळाने एका भागातील मुळ्या तुटून केळी बागांचा तोल एकीकडे अधिक झाला आहे. परंतु बागा जमीनदोस्त झालेल्या नाहीत. नुकसान ३३ टक्के नसल्याचे सांगून अशा बागांचे पंचनामे टाळण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरात केळीची मोठी हानी झाली आहे. चिंचखेडा, नेरी दिगर, हिवरखेडा, हिंगणे आदी भागांतील केळीला वादळाचा मोठा फटका बसला. अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्याची माहिती मिळाली. पंचनामे सायंकाळपर्यंत पूर्ण करून त्याची माहिती प्रशासनास सादर करण्यात आली.

धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागातही केळीची हानी झाली आहे. परंतु या भागात बुधवारच्या वादळात केळीची ४० टक्क्यांवर हानी झालेली नसल्याचेही सांगण्यात आले. नुकसानीचे पंचनामे झाले. परंतु भरपाईस विलंब केला जातो. भरपाई वेळेत मिळत नाही, अशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

६ मे रोजी जळगाव, चोपडा भागात वादळात केळीची हानी झाली होती. परंतु अजूनही शासनाकडून या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यामुळे भरपाई देण्याची कार्यवाही गतीने व्हावी, प्रशासन व लोकप्रतनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT