FPC Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Producer Company : शेतकरी उत्पादक कंपनीचा दिल्लीत डंका

FPC News : कवठे (ता. वाई) येथील समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीने दर्जेदार उत्पादन आणि आकर्षक पॅकिंग करत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Team Agrowon

Satara News : कवठे (ता. वाई) येथील समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीने दर्जेदार उत्पादन आणि आकर्षक पॅकिंग करत वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कामांची दखल घेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमासाठी १० जोडप्यांना पंतप्रधानांमार्फत विशेष अतिथी म्हणून दिल्लीत सन्मान करण्यात आला.

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारची शेतकरी उत्पादक कंपनी या योजनेची जिल्ह्यातील कवठे (ता. वाई) येथील विकास भगतसिंग डेरे व भूषण सुरेश डेरे यांना मिळाली. शेतकऱ्यांना संघटित करत ऑक्टोबर २०२१ मध्ये शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. टप्प्याटप्प्याने शेतकरी

उत्पादक कंपनीचे ७५० सदस्य केले. त्यामधील ४० बचत गटांमध्ये महिला या देखील सदस्य आहेत. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीनला योग्य भाव मिळवून देणे व शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे हे प्रमुख हेतू होते. कंपनीतील शेतकऱ्यांनी गुळापासून पावडर, हळद पावडर, हळदीचे लोणचे यांचेही उत्पादन सुरू केले आहे.

या सर्वांचा ब्रॅण्ड बनविला असून व यांचे उद्धाटन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. कृषी विभागामार्फत योजनेतून या शेतकरी उत्पादक कंपनीचे स्वत:चे २५० टनाचे गोडाऊन आहे. कंपनीच्या उत्पादनांची विक्री ही पुणे, मुंबई तसेच भारताबाहेर देखील पोहोचविली जात आहे.

सद्यःस्थितीत प्रतिवर्षी १ कोटी ९ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. कंपनीने घेतलेल्या कर्जाचीही परतफेड केली आहे. संस्थेची उत्पादने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचली आहेत. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दखल स्वातंत्र्य दिनादिवशी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमासाठी १० जोडप्यांना पंतप्रधानांमार्फत विशेष अतिथी म्हणून दिल्लीत सन्मान करण्यात आला.

तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते संस्थेला विशेष अतिथी म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन संस्थेची उत्पादने व गावाची चौकशी केल्याचे श्री. डेरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT