Kisan Rail Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Rail : किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनांचे आंदोलन

Team Agrowon

Nagar News : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात फळे, फुले व भाजीपाला पिकतो. परंतु किसान रेल्वे बंद आहेत. प्रवासी जलद रेल्वे गाड्यांमध्ये अपुरी जागा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी या मार्गावर किसान रेल्वे सुरू करावी. या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्ष, जन संसद संघटना व पीपल्स हेल्पलाइन या सामाजिक संघटना सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली.

अनिल घनवट म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतीमाल लवकरात लवकर व कमी खर्चात देशातील इतर बाजार पेठेत पोहोचवता यावा म्हणून केंद्र शासनाने अनेक किसान रेल्वे सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. मात्र सरकारने बऱ्याच किसान रेल्वे बंद केल्या आहेत.

महाराष्ट्रातून उत्तर भारतात व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या जलद प्रवासी गाड्यांमध्ये फक्त अर्धा डबा (बोगी) पार्सलसाठी असतो. मोठ्या शहरातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये अगोदरच औद्योगिक कारखान्यांचा स्टील, लोखंडाचा माल, गाड्यांचे सुटे भाग भरले जातात. पुढील स्टेशनवर येणारा शेतीमाल चढविण्यासाठी जागा राहात नाही.

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा माल पाठवला जात नाही व खराब होऊन जातो. पार्सलच्या डब्यात जागा कमी आल्यामुळे माल चढवणारे ठेकेदार, प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा हमाली वसूल करतात. रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या किसान रेल्वे सुरू कराव्यात, गरज असेल तेथे नवीन किसान रेल्वे सुरू कराव्यात.

जेथे किसान रेल्वेची सुविधा नाही तेथे प्रत्येक जलद प्रवासी गाडीला एक स्वतंत्र बोगी फक्त शेतीमालासाठी जोडण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. आंदोलनात शेतकरी संघटनेसह भारतीय जन संसदेचे नेते अशोक सब्बन, पीपल्स हेल्पलाइनचे नेते ॲड. कारभारी गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होतील, असे घनवट म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming : रासायनिक खतांच्या कमी वापरावर भर

Vegetable Cultivation : चांगल्या पाऊसमानामुळे भाजीपाला लागवड वाढली

Warehouse Construction : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Indian Agriculture : ‘पायाभूत सुविधां’मुळे शेतीत बदलाचे वारे

Orange Fruit Fall : फळगळ आख्यान

SCROLL FOR NEXT