Lok Sabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून निषेध तर मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Nashik Lok Sabha Election 2024 : आता पाचव्या टप्प्यातील मतदानादिवशी (ता. २०) नाशिकच्या शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील मेहुणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नाशिकच्या सभेत पाहायला मिळाली होती. पिंपळगाव बसवंत येथील सभेत एका शेतकऱ्याने कांद्यावरून मोदी आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवला होता. ही घटना ताजी असतानाच आता पाचव्या टप्प्यातील मतदानादिवशी (ता. २०) नाशिकच्या  शेतकऱ्यांनी देखील सरकारचा निषेध नोंदवला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील मेहुणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुणांनी गळ्यात कांदा आणि टोमॅटोच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच त्यांनी नैताळे मतदान केंद्रावर मतदान केंद्रात प्रवेश केला. यावरून त्यांना प्रवेशद्वारावरच पोलिसांनी आडवल्याने काही काळ गोंधळ उडालेला होता. तर गळ्यात कांद्याच्या आणि टोमॅटोच्या माळा घालण्यावरून पोलिस आणि तरूणांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर गळ्यातील माळा काढून ठेवत त्या तरूणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

राज्यात कांदा पिकासह शेतमालाचे भाव पडलेली आहेत. यावरून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. पण त्याबद्दल सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर मौन बाळगलेलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानादिवशी नाशिकच्या  शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. 

ग्रामस्थांनचा मतदानावर बहिष्कार

मालेगावच्या मेहुणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकत सरकारचा निषेध नोंदवला. हा बहिष्कार ग्रामस्थांनी गावच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्याने टाकल्याचे समोर आले आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत तिन्ही मतदार केद्रांकडे पाठ फिरवली असून मतदान केंद्रावर शुकशूकाट झाला आहे. दिंडोरी मतदारसंघातील मेहूणे हे गाव असून सध्या येथून भाजपकडून भारती पवार रिंगणात आहेत. 

पंतप्रधानांना थेट आवाहन

फक्त पाच दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी भर सभेत किरण सानप या शेतकरी तरुणाने थेट पंतप्रधानांना कांदा प्रश्नावर बोलण्याचे आवाहन केले होते. यावरून तेथे सभेत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र मोदी यांवर काहीच न बोलता जय श्रीरामचा नारा देत होते. यावरून त्या सानप या शेतकऱ्याने केंद्र आणि मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT