Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : अवकाळीने शेतकरी हवालदिल

Farmer Issue : गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे मक्यासह अनेक उन्हाळी पिके संकटात सापडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Team Agrowon

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे मक्यासह अनेक उन्हाळी पिके संकटात सापडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या मका पीक काढणीला आले आहे, तर हंगामाच्या सुरवातीला लागवड केलेले धानही कापणीला आले आहे. यातच मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अधूनमधून मारा सुरू आहे. त्यामुळे वादळाने जमिनीवर कोसळलेला मका काळवंडण्याची शक्यता आहे, तर लोंबी भरलेल्या धानाची कापणी लांबण्याची शक्यता आहे.

पावसाने मक्याची तोडणी लांबली आहे. मागील आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी मक्याची तोडणी केली; परंतु याचवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीट निर्मिती व्यवसायाचेही नुकसान झाले. कच्च्या विटांची माती झाली. अनेक व्यावसायिकांनी गाशा गुंडाळल्याने विटांची टंचाई निर्माण होऊ शकते.

धूलिवंदन सणापूर्वी आलेल्या वादळी पावसाने मका जमिनीवर कोसळला होता. तेव्हा कणसांत दाणे भरलेले होते. काही शेतकऱ्यांनी मका तोडणीला सुरुवात केली, तर काहींनी मका भरलेला नाही म्हणून तोडणी लांबवली.

यातच अवकाळीचा जोर अधूनमधून सुरूच होता. २० दिवसांपूर्वी वादळाने जमिनीवर कोसळलेला मका पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे. अधूनमधून अवकाळी पाऊस येत असल्याने सुरुवातीला कडधान्य पिकाची तर आता मक्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

कधी तीव्र ऊन, तर कधी पाऊस

कधी अवकाळी पाऊस, तर कधी अंगाची काहिली करणारे ऊन, अशा विषम वातावरणाचा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT