Farmer Income Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नव्हे, तर अर्ध्यावर आणले

Onion Rate : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सांगत होते. मात्र, कांद्याला असलेले चार हजारांचे भाव आज दोन हजारांवर आले, म्हणजे भाव दुप्पट नाही तर अर्धे करून ठेवले आहेत.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सांगत होते. मात्र, कांद्याला असलेले चार हजारांचे भाव आज दोन हजारांवर आले, म्हणजे भाव दुप्पट नाही तर अर्धे करून ठेवले आहेत. विकास नेमका आहे कुणाचा, असा प्रश्न करीत हे व्यापारी सरकार असून, शेतकरी विरोधाचे असल्याने हा विकास रथ एक सेकंदही येथे थांबवू नका.

त्यांची संकल्प यात्रा नको अन् काहीच नको, अशा शब्दांत कोटमगाव विठ्ठलाचे येथे सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला विरोध करीत ग्रामस्थांनी रविवारी(ता.१०) रोजी खडेबोल सुनावले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या योजनांची व धोरणांच्या माहितीच्या प्रचारासाठी तयार केलेला संकल्परथ व त्यासोबत आलेल्या स्क्रीनिंग व्हॅनसह सरकारी कर्मचारी गावोगावी जात आहेत. ग्रामसेवक तसेच गावातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या रथाद्वारे प्रचार-प्रसार सुरू असून, तालुक्यातील विविध गावांना हा रथ रोज जात आहे.

काही ठिकाणी ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत. तर काही ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत. त्यातच केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा दरात घसरण झाल्याने शेतकरी शासनाच्या विरोधात संतप्त होत असल्याचा प्रत्यय येवल्यात आला. नियोजननुसार रविवारी कोटमगाव (विठ्ठलाचे) येथे हा रथ व कर्मचारी आले होते.

मात्र,विठ्ठलाच्या मंदिरासमोर पटांगणात व्हॅन उभी करून सुरू करण्यापूर्वीच ग्रामस्थ व युवकांनी माहिती दर्शविण्यास विरोध दर्शविला. या संदर्भातचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच ही घटना घडल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘आमचा विरोध शेतकरीविरोधी धोरणाला’

या व्हिडिओत तरुण म्हणतात, ‘‘आम्हाला कार्यक्रमाला विरोध करायचा नाही; पण शेतकरीविरोधी धोरणांना विरोध आहे. आम्ही येथे प्रवेशबंदीचा फलक लावून आरक्षणासाठी आंदोलन करीत असताना तुम्ही येथे येऊन रथ उभा केला, हे योग्य आहे का? आम्हाला तुमच्या कोणत्याही योजना नकोत, कारण त्या फसव्या असतात.

शेतकऱ्यांचे सगळे वाटोळे केलं आणि आता विकास सांगत आहेत. आम्हाला उत्पन्नच नाही अन् जे थोडेफार आहे, त्याचाही जाळ झाला आहे. दूरचित्रवाणीवर चेहरा पाहून कंटाळलो आहोत. आता नकोच तो फोटो अन् प्रचार.’’ काही युवकही या प्रसंगाचे व्हिडिओ काढत असताना व्हिडिओ काढू नका, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रात्रीतून नोटबंदी होते, निर्यातबंदी होते. तिकडे पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आणि शेतकऱ्यालाच भाव नाही. शेतकरी कुठेतरी गारपीट, दुष्काळातून सावरत नाही, तोच कांदा निर्यातबंदी करून टाकली. काही खरे राहिलेले नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही युवकांनी व्यक्त केली. जनतेची एवढीच काळजी आहे, तर पेट्रोल- डिझेल, गॅस निम्म्या भावात करा आणि शेती उत्पादनांना योग्य भाव द्या, एवढे केले तरी बरे होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT