Team Agrowon
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
कांदा पिकात प्रामुख्याने फुलकिडे (थ्रीप्स) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
जेव्हा पीक परिपक्व होऊन कांद्याच्या माना पडू लागताच (म्हणजे काढणीच्या १०-१५ दिवस आधी) सिंचन बंद करावे. आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक, तुषार सिंचन) उपलब्ध असल्यास जमिनीपासून १५ सें.मी. उंच १२० सें.मी. रुंद माथा असलेले व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन गरजेनुसार लांबीचे गादीवाफे पाडावेत.
कांदा पिकास द्यावयाचे सिंचन हे हंगाम, जमिनीचा प्रकार आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, कांद्याला लागवडी वेळी, लागवडीनंतर तीन दिवसांनी आणि त्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने सिंचनाची गरज असते.
एकाच जागेवर वारंवार कांदा पीक करणे टाळावे. एकरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ०.५ - १ किलो व सुडोमोनास फ्लुरोसन्स १ किलो सेंद्रिय खतात १० दिवस मुरवून देणे.
प्रत्येक वाफ्यामध्ये १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरल्सचा वापर करावा. दोन ड्रीपरमध्ये ३० ते ५० सेंमी अंतर ठेवावे. ड्रीपरची उत्सर्जन क्षमता ताशी ४ लिटर असावी.
करपा रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येण्यास सुरुवात होताच मॅन्कोझेब# २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल# २५ ई.सी. १ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी. गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.