Upsa Irrigation Management Department Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी

Irrigation Management : सर्व शेतकऱ्यांनी थकित पाणीपट्टी व चालू करावयाच्या पाणी आवर्तनाकरिता आगाऊ रब्बी हंगामाची प्रचलित दरानुसार पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. रा. कोरे यांनी केले.

Team Agrowon

Sangli News : म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी प्राध्यान्याने पाणी मागणी अर्ज भरून लवकरात लवकर पाण्याची मागणी करावी. पाणी मागणी अर्ज योजनेच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात व प्रत्येक सिंचन व्यवस्थापनाच्या शाखा कार्यालयात उपलब्ध केलेले आहेत.

योजनेची थकित पाणीपट्टी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी थकित पाणीपट्टी व चालू करावयाच्या पाणी आवर्तनाकरिता आगाऊ रब्बी हंगामाची प्रचलित दरानुसार पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. रा. कोरे यांनी केले.

कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ योजनेचे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ७१ हजार ६९७ हेक्टर व सोलापुरातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील १० हजार हेक्टर असे एकूण ८१ हजार ६९७ हेक्टर लाभक्षेत्र असून त्यापैकी ७९ हजार ३०० हेक्टर लाभक्षेत्राची सिंचननिर्मिती पूर्ण झाली आहे.

म्हैसाळ सिंचन योजनेचे २०२३-२४ या सिंचन वर्षातील रब्बी हंगामामधील पाणी आवर्तन कालवा समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे १८ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. पाणी देण्याचे धोरण शेवटच्या भागापासून ते सुरुवातीच्या भागापर्यंत देण्याचे ठरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT