Sangli Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane : उसावर लोकरी माव्याचे संकट, सांगली जिल्ह्यातील शेतकरी हतबल

Sugarcane Season Sangli : ऊसतोड हंगाम लांबणीचा परिणाम सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात होताना दिसून येत आहे. कडेगाव तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Dieses Sangli : ऊसतोड हंगाम लांबणीचा परिणाम सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात होताना दिसून येत आहे. कडेगाव तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उसावर लोकरी माव्याचे संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर सांगलीत उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पाऊस थांबल्यानंतर काही दिवसांतच लोकरी माव्याची कीड आली असून या किडीचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.

लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी तसेच वाडे काळे पडले आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने उसाची वाढ खुंटत आहे. ऊसाला लोकरी माव्याने विळखा घातल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. आडसाली ऊस उंच असल्याने औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या संकटाचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असल्याने कारखान्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिके देऊन प्रसंगी औषध पुरवठाही होणे गरजेचे आहे. यापूर्वी आलेल्या संकटकाळात लोकरीमावा खाणारी मित्र कीड विकसित झाली आहे. ही मित्र कीड या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी येथील साखर कारखान्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे असे शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे.

उसावर अनेक ठिकाणी लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे असे सूर शेतकरी वर्गातून उमटला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT