Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Theft : शेतात पाईप, सिंचन यंत्रणांची नासधूस, चोरीचे प्रकार

Latest Agriculture News : वाळू चोरी, अवैध धंद्यांत अग्रेसर असलेल्या गावांत सध्या शेतांत ठिबक, सिंचन यंत्रणांची नासधूस, शेतीमालाची चोरी व अन्य समस्या वाढल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : वाळू चोरी, अवैध धंद्यांत अग्रेसर असलेल्या गावांत सध्या शेतांत ठिबक, सिंचन यंत्रणांची नासधूस, शेतीमालाची चोरी व अन्य समस्या वाढल्या आहेत. पोलिस या प्रकाराबाबत कुठेही गंभीर नाहीत. फिर्यादी शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळत नसल्याची स्थिती आहे.

मध्यंतरी रावेर तालुक्यातील चीनावल व अन्य गावांत केळी बागेचे नुकसान अज्ञात भामट्यांनी केले होते. यानंतरही निंभोरा व अन्य भागात रोहित्रातील मूल्यवान धातू चोरणे, तारा चोरून नेणे असे प्रकार घडले. अलीकडे भुसावळातील अनेक गावांत कांद्याची चोरी झाली.

तळवेल, पिंपळगाव, वरणगाव या भागांत शेतकरी शेतीमालाच्या शेतातील चोरीने जेरीस आले आहेत. शेतकरी तक्रार करतात. पीक संरक्षण सोसायट्या नावालाच असल्याने ही चोरी आता रोखली जात नाही. पोलिस या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत नाही. फिर्यादी शेतकऱ्याची तक्रार घेण्यात पोलिस ठाण्यात अनेकदा नकारघंटा वाजविली जाते.

अलीकडेच जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथील शेतकरी चंद्रकांत राजेंद्र जाधव यांच्या शेतात पिकांना विद्राव्य खते देणाण्यासंबधी उपयोगात आणल्या जाणाऱ्या व्हेंच्युरीचे नुकसान अज्ञात भामट्यांनी केले. तसेच शेतातून कैऱ्या चोरून नेल्या. यामुळे शेतात सिंचनाचे काम बंद पडले. शेतात लहान केळी, पपई, कांदा, मका आदी पिके आहेत. त्यांचे नुकसान होऊन मोठा फटका बसेल, असा प्रयत्न यामागे असावा.

फुपनगरी गाव पाणीचोरी किंवा वॉटर स्मगलर, अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच गावात दुफळी असून, राजकीय वैमनस्य, व्यावसायिक स्पर्धा व भामटेगिरीचा प्रकारही आहे. यापूर्वीही जाधव यांना गावातील काही शेतकऱ्यांनी हकनाक त्रास दिला होता. यातूनच हा प्रकार झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली. परंतु पुढे पोलिसांनी काहीएक कार्यवाही केलेली नाही. यामुळे जाधव यांना शेताची राखणदारी करावी लागत आहे.

पोलिस निष्क्रिय कसे ?

शेतातील चोरी, नासधूस याबाबत कुठेही मोठी कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या चोऱ्यांकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते. यामुळे पोलिस यंत्रणेचेच यास बळ आहे का, असाही प्रश्‍न शेतकरी उपस्थित करतात. यामुळे पोलिसातील वरिष्ठांनी याची दखल घेऊन काय उपाययोजना करता येतील, याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT