Milk Rate In Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate In Maharashtra : दुधाचे दर पडल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर; दूध अंगावर ओतून सरकारला दिला इशारा

Milk Issue : राज्यातील दुधाचे खरेदी दर कोसळल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजगाव येथे शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.१) रस्तारोको आंदोलन सुरू केलं आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील दुधाचे खरेदी दर कोसळल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजगाव येथे शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.१) रस्तारोको आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून दुधाचे खरेदी दर कोसळले आहेत.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संतप्त होत आंदोलन पुकारलं आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.   

शेतकऱ्यांनी दुधाला दर मिळत नाही म्हणून रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या मुलांच्या तोंडातील सरकार घास काढून घेत आहे. त्यामुळे रस्त्यावर दूध ओतून सरकारला इशारा देत असल्याचे सांगितले. 

राज्यातील दुधाचे खरेदीदर घसरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा फटका बसतोय, असं दूध उत्पादक सांगत आहेत. दूध खरेदी दर ३८ रुपये मिळत होता.

परंतु आता ३३ रुपये प्रतिलीटर दराने दूध खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागतेय. त्यामुळे राज्यातील विविध भागात दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत.

दरम्यान, एकीकडे केंद्र सरकारनं दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र दूध उत्पादकांकडून कमी दरात दूध खरेदी केली जात आहे. मागील ११ वर्षात देशात दुग्धजन्य पदार्थांची आयात केलेली नाही.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT