Team Agrowon
दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण ०.१२ टक्के असते. हे कॅल्शिअम दुधामध्ये कॅल्शिअम केसिनेटच्या स्वरूपात आढळते. ताज्या दुधामध्ये कॅल्शिअम सायट्रेट हे खनिज आढळते.
दुधामध्ये फॉस्फरसचे प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. हे P२ O५ या स्वरूपात आढळते. फॉस्फरस हा प्रथिनांबरोबर आढळतो. पाण्यामध्ये तो द्रव्यरूप किंवा विद्राव्यरूपात आढळतो.
दुधामध्ये सोडियमचे प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. सोडियम क्लोराइड व सोडियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) या स्वरूपात आढळतो. राख पाण्यामध्ये विद्राव्य आहे.
पोटॅशिअमचे दुधात प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. चिकामध्ये याचे प्रमाण जास्त असते.
दुधामध्ये फ्लोराइडचे प्रमाण ०.१८ टक्के एवढे असते. चिकामध्ये याचे प्रमाण जास्त असते. कासदाह झालेल्या जनावरांच्या दुधात फ्लोराइडचे प्रमाण जास्त असते. फ्लोराइडची राख पाण्यामध्ये द्राव्य आहे.
दुधामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण ०.१ टक्के एवढे असते. हाडे, दात मजबूत बनवण्यासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस सोबत काम करतो.
दुधामध्ये सल्फरचे प्रमाण ०.०२९ टक्के असते. हाडांच्या लवचिकतेसाठी कार्य करतो.