Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Assistant Strike : कृषी सहायकांच्या कामबंद आंदोलनाचा कामांवर परिणाम

Agriculture Department Scheme : राज्यातील कृषी सहायकांनी मागील पाच मे पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने १५ मे पासून सर्व कृषी सहायक कामबंद आंदोलनावर आहेत.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू झाले आहेत. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना, कृषी विभागाकडून मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा, बियाण्यांचे वाटप, खत वितरण व फवारणीच्या सल्ल्‌याचा अभाव जाणवू लागला आहे.

राज्यातील कृषी सहायकांनी मागील पाच मे पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने १५ मे पासून सर्व कृषी सहायक कामबंद आंदोलनावर आहेत. यामुळे पेरणीपूर्व मार्गदर्शन, बीज प्रक्रिया प्रात्याक्षीक, उगवण क्षमता तपासणी या कामावर परिणाम झाला आहे.

कृषी सहाय्यक कामावर नसल्याने विविध योजनेतील अनुदानित बियाणे वाटप, कोण करणार या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. कृषी सहाय्यक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये वेतनवाढ, नियमितीकरण, सेवा शर्तींमध्ये सुधारणा, कामाच्या वाढत्या तणावावर उपाय अशी प्रमुख मागणी आहे.

आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून कमी वेतनात काम करत आहोत. शेतकऱ्यांना सेवा देताना आमच्यावरच ताण येतो परंतु सरकार आमच्या मांगण्याकडे दुर्लक्ष करते, असे कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पवार यांनी सांगितले.

आगामी काळात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १९ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ३१२ मे रोजी कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

यानंतर कृषी आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. तर ऐन पेरणीच्या तोंडावर कृषी सहायकांनी आंदोलन पुकारल्यामुळे बियाणे, निविष्ठा, शेतीशाळा, पोखरा योजनेतील नियोजन, फळबाग लागवड आदी कामे ठप्प झाल्याने नुकसान होत असल्याचे बळवंत मोरे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT