Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापूस खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांना फटका

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः कापूस लागवडीत जळगाव राज्यात आघाडीवर आहे. परंतु जिल्ह्यातील यावलसह जळगाव, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारातील तळोदा भागात शासकीय खरेदी केंद्रे सुरूच झालेली नाहीत.


जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाने अलीकडेच कापूस खरेदी केंद्र पाचोरा, शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे सुरू केले. परंतु इतर भागांत खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यात यावल, धरणगाव, पारोळा येथे पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जाते.

परंतु महासंघाचे केंद्र सुरू होतील की नाही, हा प्रश्न आहे. यावल, चोपडा, जळगाव तालुक्यांत शासकीय कापूस खरेदी केंद्रच नाही. तसेच कापसाचा साठा कायम आहे. यामुळे खासगी खरेदीदार दर पाडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

चोपडा, जळगाव, भुसावळ, बोदवड येथे कापूस महामंडळाने खरेदी केंद्र निश्चित केले आहे. परंतु या केंद्रांत कापूस खरेदीचा प्रारंभ झालेला नसल्याची स्थिती आहे. यावल येथे खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने तेथील शेतकऱ्यांना आपल्या कापसाची विक्री व्यापाऱ्यांना मिळतील, त्या दरात करावी लागत आहे.

पणन महासंघाने खरेदी केंद्र यावल येथे दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते. जेथे पणन महासंघाचे केंद्र आहेत, तेथे सीसीआय किंवा कापूस महामंडळ खरेदी केंद्र सुरू करीत नाही, हीदेखील अडचण असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, नंदुरबारमधील तळोदा येथेही शासकीय कापूस खरेदी केंद्राची मागणी आहे. परंतु तेथेही केंद्र सीसीआय सुरू करीत नाही, असा दावा केला जात आहे.


दर हमीभावापेक्षा कमी
कापसाचे दर बाजारात हमीभावापेक्षा कमी असून ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी ७०२० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. शेतकऱ्यांकडे दर्जेदार कापूस आहे. परंतु त्याला दर कमी असल्याने शासकीय खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

काही खरेदी केंद्र अग्नी सुरक्षा (फायर सेफ्टी) परवान्यांमुळे सुरू झालेले नाहीत. तर काही केंद्रधारक खरेदी सुरू करण्यासाठी इच्छुक नाहीत. जे इच्छुक नाहीत, त्यांच्या केंद्राऐवजी इतर भागात खरेदी केंद्र सुरू करावेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. कापसाचे दर मागील दीड महिन्यापासून हमीभावापेक्षा खेडा खरेदीत अपवादानेच मिळाले आहेत. यामुळे शासकीय खरेदी सर्वत्र वेगात सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT