Pink Bollworm  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop : पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात

Pink Bollworm : गुलाबी बोंड अळीचा प्रकोप पूर्वहंगामी कापूस पिकात वाढला आहे. बोंडेच उमलत नसल्याची स्थिती आहे. क्षेत्र रिकामे करून पुढे त्यात रब्बी हंगाम साधला जावा, यासाठी शेतकऱ्यांनी क्षेत्र रिकामे करण्यास सुरवात केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गुलाबी बोंड अळीचा प्रकोप पूर्वहंगामी कापूस पिकात वाढला आहे. बोंडेच उमलत नसल्याची स्थिती आहे. क्षेत्र रिकामे करून पुढे त्यात रब्बी हंगाम साधला जावा, यासाठी शेतकऱ्यांनी क्षेत्र रिकामे करण्यास सुरवात केली आहे.

खानदेशात सुमारे सव्वालाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यात जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे ९५ हजार हेक्टरवर झाली होती. या पिकात पहिल्या तीन वेचण्या आटोपल्या आहेत.

पूर्वहंगामी कापसाचे पीक जळगाव जिल्ह्यात चोपडा, जामनेर, यावल, जळगाव, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, तळोदा भागात अधिक होते. तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या क्षेत्रात दरवर्षी मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड केली जाते.

यंदा लागवड किंचित घटली होती. मागील हंगामात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये कापूस वेचणी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे.पिकात मागील १० ते १२ दिवसांत गुलाबी बोंड अळीची समस्या आणखी वाढली आहे. यामुळे बोंडेच उमलत नसल्याची स्थिती आहे. गुलाबी बोंड अळीसह बोंडसडची समस्याही आहे.

मका लागवडीकडे कमी कल

काही शेतकरी चारा व धान्यासाठी मका लागवड करीत आहेत. परंतु तुलनेत मका लागवड कमी होईल, असे चित्र खानदेशात सध्या आहे. कारण मक्यास लष्करी अळीचा धोका असतो. खर्चही वाढला आहे. तसेच पाच महिन्याचे हे पीक आहे. पाणी त्यास अधिक लागते. यंदा पाऊसमान कमी आहे. यामुळे मका लागवड कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT