Pradhan Mantri Vima Yojana agrowon
ॲग्रो विशेष

Pradhan Mantri Vima Yojana : १ रूपयाच्या प्रधानमंत्री विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Pik Vima : कोल्हापूर जिल्ह्यात या पीक विमा योजनेला रब्बी हंगामात म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Agriculture News : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. यामध्ये खरिप आणि रब्बी पिकांना संरक्षण देण्यासाठी फक्त १ रुपया भरून विमा काढण्याची संधी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

परंतु कोल्हापूर जिल्ह्यात या पीक विमा योजनेला रब्बी हंगामात म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

खरिपानंतर राज्य सरकारने रब्बी पिकालाही १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. पण, ही योजना तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कृषी विभागातच राहिली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गावागावात जनजागृती म्हणावी तशी न झाल्याने याला प्रतिसाद कमी मिळाला आहे. जिल्ह्यातून केवळ ८८ शेतकऱ्यांनीच विमा उतरवला आहे. अवघ्या १ रुपयाचा विमा असूनही शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत असल्याने एक रुपयात रब्बी पिकांचा विमा उतरवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी गहू, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, हरभरा या पिकांसाठी १ रुपयात विमा काढण्यात येणार आहे. रब्बी हरभरा, गव्हासाठी विमा उतरवण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

१ रुपयात विमा काढल्यानंतर नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्ती, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, हंगामाच्या अखेरच्या उत्पन्नावर आधारित नुकसान झाल्यास गव्हासाठी हेक्टरी ३८ हजार, ज्वारीसाठी ३१ हजार, उन्हाळी भुईमुगासाठी ४२ हजार ९७१, हरभऱ्यासाठी ३५ हजार रुपये भरपाई मिळू शकते.

कुठे घेता येतो विमा

शेतकरी आपल्या वित्तीय संस्थांकडून पीक विमा घेऊ शकतात. याशिवाय https://pmfby.gov.in /farmer Login यावरूनही विमा उतरवता येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT