Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना सहा वर्षांपासून कर्जमाफीची प्रतीक्षाच

Loan Waive Scheme : सन २०१७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या काळात जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजने अंतर्गत १३ हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

 गोपाल हागे

Akola News : सन २०१७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या काळात जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजने अंतर्गत १३ हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील शेतकरी अन्याय निवारण कृती समितीने नुकतेच अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तत्कालीन राज्य सरकारने २८ जून २०१७ रोजी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, यात निकष व अटींचा.

भरणा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यामुळे शासनाला रोज नवीन आदेश जारी करावे लागत होते. दरम्यान अद्यापही जिल्ह्यातील १३ हजार ३४ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. यात अडगाव येथील केंद्रीय कृषक सेवा सहकारी सोसायटीचे २४८ पात्र सभासद शेतकरी सुद्धा आजपर्यंत कर्जमाफीपासून दूरच आहेत.

तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज माफ झाल्याचे तेव्हा सांगितले होते. या कृषक संस्थेच्या २४८ पैकी चार शेतकऱ्यांना सपत्निक सत्कारही करीत प्रमाणपत्र, साडीचोळी, कपडे देण्यात आले होते. त्यांनाही दिवाळी येऊन गेली तरीही अजूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांना संस्थेकडून निलचा दाखला मिळाला नाही. त्यामुळे दुसरे कर्ज व इतर कोणतेही लाभ घेता आले नाहीत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अशोक घाटे, उपाध्यक्ष राहत खाँ, मजित खॉं, सचिव अमोल मसरकार यांच्यासह इतर सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT