Midday Meal  Agrowon
ॲग्रो विशेष

Midday Meal : ‘शालेय पोषण आहारा’त केळीच्या समावेशाने आनंद

Banana In Midday Meal : पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंडी, केळीचा समावेश करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने ७ नोव्हेंबर रोजी काढला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्याचे मुख्य पीक ‘केळी’ असल्यामुळे त्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून शासनाने शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंडी, केळीचा समावेश करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने ७ नोव्हेंबर रोजी काढला आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. परंतु केळीला कायमस्वरूपी हमी भाव मिळण्याची शाश्वती नव्हती.

तसेच गारपीट, वादळ अशा स्वरूपाच्या नैसर्गिक संकटांत केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही शेतकरी सोसत आहेत. पोषण आहारामध्ये केळीचा समावेश झाल्याने केळी उत्पादक राज्यातील शासकीय तसेच शासन मान्य शाळामध्ये माध्यान्ह भोजनांतर्गत पोषण आहार देण्यात येत आहे.

यात नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहार व्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यानुसार विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येणार आहेत. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत. त्यांना केळी अथवा स्थानिक बाजारपेठे उपलब्ध असणारे फळ देण्यात यावेत असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

केळी उत्पादक महासंघ, फळबागायतदार संघ (रावेर, जि.जळगाव), केळी उत्पादक, भारतीय किसान संघानेही पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेने केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी

Ai in Farming: प्रतापराव पवार यांचे कृषी ‘एआय’ वापराचे काम उल्लेखनिय : गडकरी

National Panchayat Award 2025: राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारांमध्ये राज्यातील ग्रामपंचायतींची बाजी

Nitin Gadkari: व्यवसायात विश्‍वासार्हता, नैतिकता महत्त्वाची

Gram Panchayat Issue: चौदा हजार सरपंच प्रशासकांचे हात बांधलेले

SCROLL FOR NEXT