Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : विटेतील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे काम रोखले

Land Acquisition : कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी जमिनी देणार नाही, अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Team Agrowon

Pandharpur News : नागपूर ते गोवा (शक्तिपीठ) महामार्गाला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मंगळवारी (ता.८) विटे (ता. पंढरपूर) येथील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम रोखले.

त्यामुळे अधिकाऱ्यांना जमीन मोजणी न करता परतावे लागले. कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी जमिनी देणार नाही, अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी तालुक्यातील विटे, पोहरगाव, पुळूज, आंबे, सरकोली, कासेगाव, तपकिरी शेटफळ आदी भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, जमीन मोजणी प्रक्रियेला या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. विटे येथे जमीन मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी आले असता, येथील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम रोखले.

यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गाला विरोध केला. शासनाने सक्तीने जमीन मोजणीचा प्रयत्न केल्यास पंढरपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही यावेळी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

जमीन मोजणीस विरोध असल्याचे लेखी निवेदनही या शेतकऱ्यांनी भूमिअभिलेख कार्यालयास दिले आहे. मोहोळ, बार्शी पाठोपाठ आता पंढरपूर तालुक्यातही शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी एकवटले असून, प्रशासन विरुद्ध शेतकरी, असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT