Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Interest Waiver : रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाखा रुपयांचा लाभ

Farmer Loan Relief : शासनाच्या १२ जानेवारी २०२४ च्या निर्णायानुसार २०१४-१५ या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील चार वर्षांवरील ६ टक्के दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

Team Agrowon

Ratnagiri News : फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना रूपांतरित कर्जावर (पुनर्गठीत) २०१४-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षाची व्याजमाफी सहा टक्के दराने देण्याचा निर्णय शासनाने २०२४ मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये मिळाले आहेत.

शासनाच्या १२ जानेवारी २०२४ च्या निर्णायानुसार २०१४-१५ या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील चार वर्षांवरील ६ टक्के दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत ४७७ शेतकऱ्यांसाठी सात कोटी ७५ लाख ६ हजार ३३३ रुपये मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला होता.

त्यापैकी पात्र २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित १८० लाभार्थ्यांची फेरतपासणी जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना ही रक्कम दिली जाईल.

जिल्ह्यातील ४७७ कर्जदारांपैकी २०१४-१५ या वर्षातील पुनर्गठन झालेल्या २९७ जणांना २ कोटी २२ लाख २३ हजार एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित १८० जणांना ५ कोटी ५२ लाखांएवढी रक्कम अद्याप मिळालेली नाही. या खातेदारांची जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेंट्रल कोकण ग्रामीण बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांतून शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारने लोकसभा-विधानसभा निवडणुकांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४७७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आले होते त्यापैकी २९७ जणांना लाभ मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT