Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : परतीच्या पावसाची भीती

Paddy Crop : काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाचा निसवलेल्या भाताच्या पिकाला धोका होऊ शकतो, या भीतीने शेतकरी काळजीत पडले आहे.

Team Agrowon

Raigad News : रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील भाताच्या पिकांनी हिरवीगार शेती बहरली आहे. काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाचा निसवलेल्या भाताच्या पिकाला धोका होऊ शकतो, या भीतीने शेतकरी काळजीत पडले आहे.

परिसरातील वडगाव, आपटे, चावणे, गुळसुंदे, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. यंदा मॉन्सून २० दिवस उशिरा दाखल झाला आहे. याचा फटका पावसावर विसंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. पाऊस पडल्यावर बियाण्यांची पेरणी केल्यावर लावणीसाठी तयार झालेल्या रोपांना जुलैमधील अतिवृष्टीचा फटका बसला.

यात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर श्रावणात हवामानात अचानक बदल झाला. ऊन-पावसामुळे पिकावर परिणाम झाला. काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला. तर काही जणांनी पीक वाचवण्यासाठी रासायनिक खते टाकून, कीटकनाशक औषध फवारणी केली, असे शेतकरी माळी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी रत्ना, जया, अवनी, वैष्णवी, कर्जत कोलम अशा विविध प्रकारच्या जातीच्या वाणांची लागवड केली आहे. परिसरात सर्वत्र पीक निसवू लागल्याचे दिसत आहे. हिरव्यागार भातपिकांनी शेत बहरली आहे.

भाताचे पीक चांगले आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दोन वेळा खत टाकले आहे. सध्या पीक निसवू लागले आहे. परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. जास्त पाऊस पडला, तर फुलोरा धुवून जाईल. कापणीसाठी तयार होत असलेले पीक आडवे पडून नुकसान होईल, अशी भीती आहे. साधारण २० दिवसांत पीक कापणीसाठी तयार होईल.- कैलास म्हात्रे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT