Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Farmer : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांची दिवाळी कोरडी

Solapur Dairy Farmer News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने दूध उत्पादकांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची दिवाळी भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली.

सुदर्शन सुतार

Solapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने दूध उत्पादकांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची दिवाळी भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. पण सोलापूर जिल्ह्यात मात्र पुन्हा एकदा दुधाचा खरेदीदर प्रति लिटर एक रुपयाने कपात करत शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी घालवण्याचा प्रयत्न होत आहे.

जिल्ह्यात या महिन्यात गाईच्या दुधाच्या खरेदी दरात आणखी एक रुपया कपात करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सहकारी व खासगी संस्थांनी घेतला आहे. गेल्या अडीच महिन्यांतील ही चौथी दर कपात आहे.

जिल्ह्यात रोज खासगी आणि सहकारी संघाचे दूध संकलन १८ लाख लिटरपर्यंत आहे. त्यात जिल्हा संघ आणि शिवामृत या दोन्ही सहकारी संघाचे साधारण दीड लाख लिटर दूध आहे. उर्वरित सर्व दूध खासगी संघाकडे जाते.

गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपये दर देणे बंधनकारक आहे. पण सातत्याने दरातील घसरण होत होत तो आता ३० रुपयांवर आला. त्यात आता पुन्हा आणखी १ रुपया कपात केल्याने तो २९ रुपयांवर आला आहे.

एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे पशुखाद्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना, दरकपातीमुळे दूध उत्पादकांच्या वेदनेची जाणीव जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला असल्याचे दिसून येत नाही.

या उलट कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात तेथील सहकारी संघाने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना तब्बल १०१ कोटी रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

खासगी संघाकडून लूट

जिल्हा सहकारी संघ सक्षम असताना जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दरवर्षी दिवाळी बोनस वाटप केला जात होता. या बोनस रकमेमुळे दूध उत्पादकासह व्यापाऱ्यांची मोठी उलाढाल होत असे, मात्र गेल्या पंधरा वर्षांमध्ये जिल्हा दूध संघाच्या ‘मालकांनी’ पुणे जिल्ह्यातील खासगी दूध संघांचे हस्तक म्हणून काम केल्याने संघ लयाला गेला.

नफा हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या खासगी संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांची लूट सुरू केली आहे. या संघांकडून दिवाळी बोनस देणे दूरच, उलट दुधाचे दर सतत पाडत दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे.

जिल्ह्यातील सहकारी संस्था लोकप्रतिनिधींनी मोडून खाल्ल्या, अशिक्षित असणाऱ्या दूध उत्पादकाला याची जाणीव राहिली नाही. आज मात्र भयंकर स्थिती निर्माण होत आहे. एकीकडे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात १०० कोटी रुपये बोनस स्वरूपात मिळत आहेत. मात्र याच वेळी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना लुटले जात आहे.
- भाऊसाहेब धावणे, डिकसळ, ता. मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT