Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनी कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत सहभागी केळी उत्पादकांचे २०२१-२२ व २०२२-२३ चे प्रश्‍नही प्रलंबित आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात मागील हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी केंद्र सरकार पुरस्कृत भारतीय कृषक विमा कंपनीची (एआयसी) नियुक्ती केली आहे. परंतु या कंपनीकडे केळी पीकविमाधाकांच्या अनेक तक्रारी पडून आहेत. कुठलीही कार्यवाही होत नाही. जे कर्मचारी भेटतात, ते उडवाउडवीची माहिती देतात. समाधानकारक माहिती मिळत नाही, अशा तक्रारी आहेत.

फळ पीकविमा योजनेत सहभागी केळी उत्पादकांचे २०२१-२२ व २०२२-२३ चे प्रश्‍नही प्रलंबित आहेत. अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांचे २०२२-२३ मध्ये वेगाचा वारा किंवा वादळात नुकसान होऊन पंचनामे झाले, पण त्यांनाही परतावे मिळालेले नाहीत. तसेच अनेकांचे प्रस्ताव रद्द केले. काहींचे प्रस्ताव मान्य करून कमी क्षेत्रासाठी परतावे दिले, याबाबतही तक्रारी २०२२-२३ या वर्षासंबंधी आहेत.

२०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना परतावे वेळेत मिळाले नाहीत. अनेक प्रस्ताव एआयसीने प्रलंबित ठेवले आहेत. त्यात वेगाचा वारा व इतर बाबींसंबंधी पंचनामे झाले, पण दावे प्रलंबित आहेत. अनेक केळी विमाधारकांचा विमा योजनेतील सहभाग संपुष्टात केल्याचा प्रकार विमा कंपनीने केला. शेतकऱ्यांनी केळी लागवड, जिओ टॅगिंग, पंचनामे आदी कार्यवाही करून प्रस्ताव सादर केले.

अनेकांच्या प्रस्तावांवर कार्यवाही प्रलंबित आहे. ३१ जुलै २०२३ रोजी केळी पिकासंबंधीचा विमा संरक्षण कालावधी संपला आहे. हा कालावधी संपल्यानंतर पात्र विमाधारक शेतकऱ्यांना ४५ दिवसांत परतावे देय असतात. परंतु अद्याप परतावे वेळेत मिळालेले नाहीत कमी परतावे, वादळात हानीचे पंचनामे होऊनही परतावे न मिळणे आदी तक्रारी घेऊन, चौकशीसंबंधी शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात जातात.

जिल्ह्यात १५ तालुक्यांत कंपनीची कार्यालये आहेत. पण त्यात कर्मचारीच नाहीत. जळगाव, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा, बोदवड आदी भागांत ही कार्यालये ओस पडली आहेत. कर्मचारीच त्यात उपस्थित नसतात. शेतकरी संबंधितांना मोबाईलवर संपर्क करतात, पण कुणी प्रतिसाद देत नाही, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT