PM Kisan's scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित

Agriculture Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या वतीने दिले जातात.

Team Agrowon

Buldana News : केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. मात्र, अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याने तालुका कृषी कार्यालयात विचारणा करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात. ही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, वाढीव कर्मचारी शासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या वतीने दिले जातात. त्याच धर्तीवर आता राज्य शासनाने योजना सुरू केली आहे.

मात्र, केंद्र व राज्य शासनाने योजना सुरू केली असली तरी याची स्वतंत्र यंत्रणा प्रस्तावित करणे गरजेचे होते. परंतु तसे झालेले नाही. कृषी विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने यंत्रणेवर अधिकचा भार असल्याने सन्मान योजनेचे पैसे मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात शेतकऱ्यांना उंबरठे झिजवावे लागत आहेत.

यापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे काम हे महसूल विभागाकडे होते. त्यामुळे त्यांच्याकडेही सेतू सुविधा केंद्रात ऑपरेटरची यंत्रणा कार्यान्वीत होती. मात्र, आता या योजनेत वाद झाल्याने योजना कृषी विभागाकडे शासनाने वर्ग केली आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा निधी आता मिळणार आहे. यात नवीन नावे जोडणे, जुन्या नावांची दुरुस्ती करणे, नावात बदल करणे, यासारखी कामे कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. या सन्मान योजनेतही आजपर्यंत अनेक शेतकरी वंचित राहलेले आहेत. हे वंचित शेतकरी आता कृषी कार्यालयात चकरा मारून विचारणा करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT