Strawberry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Processing Industry : स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योग उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगाची उभारणीदेखील या भागात करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Team Agrowon

Amravati News : पारंपरिक पीक पद्धतीवर भिस्त असलेल्या चिखलदरा तालुक्‍यात नजीकच्या काळात स्ट्रॉबेरीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. पर्यटकांकडून वाढती मागणी असल्याने उत्पन्नाचा हा नवा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. आता स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगाची उभारणीदेखील या भागात करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय तसेच आत्माच्या पुढाकाराने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्‍यात दहा-बारा वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले होते. या भागात येणाऱ्या पर्यटकांकडून ताज्या स्ट्रॉबेरीची थेट शेतातूनच खरेदी होत होती. त्यामुळे मागणी वाढत यातून चांगला पैसाही शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली.

त्यामुळे त्यापुढील टप्प्यात स्ट्रॉबेरीखालील क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली. शेतकऱ्यांद्वारे थेट महाबळेश्‍वर व इतर भागातून रोपांची खरेदी होत लागवडीवर भर देण्यात आला. मात्र पर्यटकांची संख्या कमी असलेल्या काळात स्ट्रॉबेरीला अपेक्षित मागणी राहत नाही. त्यातच या फळाची टिकवण क्षमता कमी असल्याने ते खराब होण्याची शक्‍यता अधिक राहते. त्यामुळे होणारे संभावीत नुकसान टाळता यावे याकरिता या भागात स्ट्रॉबेरीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्ट्रॉबेरीखालील लागवड दोन एकराची आहे. यातून आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न तर चार लाख रुपयांचा खर्च होतो. मात्र या पिकाला विमा संरक्षण नसल्याने अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीकाळात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान राहते. त्यामुळे या पिकाला विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी आहे.
संजय खडके, अलाडोह, अमरावती
चिखलदरा येथे उत्पादित स्ट्रॉबेरीला शाश्‍वत मार्केट नाही. परिणामी दरात चढउतार होतात. ही बाब लक्षात घेता शासनाने त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी. त्यामुळे प्रक्रियाजन्य पदार्थांतून मूल्यवर्धन होण्यास मदत होणार आहे.
साधुराम पाटील, शेतकरी मोठा, ता. चिखलदरा, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT