Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : शेतीपंपाला सुरळीत वीजपुरवठा करा

Agriculture Pump : गावात तीन लाइनमन आहेत. सध्या शिवारातील तडवळा व खामसवाडी ए.जी. फिडरला जास्त प्रभारामुळे शेतीपंपाला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.

Team Agrowon

Dharashiv Latest News: विजेअभावी रब्बी हंगामातील पिकांना देण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतीपंपाला आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी वैतागलेले शेतकरी गुरुवारी (ता. नऊ) वीज उपकेंद्रावर धडकले.

खामसवाडी गावात ३३ के.व्ही.चे वीज उपकेंद्र आहे. गाव शिवारात शेतीसाठी बंजारा, खामसवाडी ए.जी. व तडवळा असे तीन फिडर आहेत, तर गावठाण फिडर गावासाठी आहे. गावात तीन लाइनमन आहेत.

सध्या शिवारातील तडवळा व खामसवाडी ए.जी. फिडरला जास्त प्रभारामुळे शेतीपंपाला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. भारनियमनामुळे शेतीला केवळ आठ तास वीज मिळते. तीही सलग सुरळीत मिळत नसल्यामुळे शेतीपंप चालत नाहीत.

परिणामी पिके जगविणे शेतकऱ्यांना कठीण झाले असल्याचे शेतकरी सचिन शेळके यांनी सांगितले. ऊस लागवडीला अडथळा येत असून, रब्बी पिकांना पाणी देता येईना. खामसवाडी ए.जी. फिडरवरील शेतीपंपाला तीन-चार दिवसांपासून सुरळीत वीजपुरवठा होत नाही.

शेतकरी आठ दिवसांतून दोन दिवस भारनियमन कमी करून सहा दिवस सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करीत आहेत. काही ट्रान्सफॉर्मर बंद करावे लागतात. त्यासाठी लाइनमनला अडचण येत आहे. ती अडचण दूर करण्यासाठी चार ठिकाणी नवीन एबी स्विच बसविणे सुरू आहे, असे अभियंता कुटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT