MIDC Project Agrowon
ॲग्रो विशेष

MIDC Project : एमआयडीसीसाठी जमीन देण्यास विरोध कायम

Land Reservation : सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव, रजाळवाडी, मंगरूळ व मोढा या चार गावांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नियोजित एमआयडीसीसाठी सातशे हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, बुधवारी (ता. २८) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात डोंगरगाव येथे विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव, रजाळवाडी, मंगरूळ व मोढा या चार गावांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नियोजित एमआयडीसीसाठी सातशे हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे.

चारही गावांच्या महसूल गाव सात-बारा व इतर हक्कामध्ये औद्योगिक वसाहत महामंडळ नाव टाकून बोजा टाकण्यात आलेला आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी शासकीय यंत्रणा जमीन मोजणीसाठी आली असताना शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध केला होता. याप्रश्नी शेतकरी, नागरिकांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत बहुतांश शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला. आम्हाला जमीन द्यायची नसून, आमच्या सात-बारावरील एमआयडीसीचा बोजा तत्काळ कमी करण्यात यावा व शासनाला तसा अहवाल पाठवून एमआयडीसी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.

यासंदर्भात उपस्थितांनी श्री. स्वामी यांना निवेदन दिले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, चेतन गिरासे यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT