banana damage  
ॲग्रो विशेष

Banana Crop Damage : केळीबागा नुकसानीचे पंचनामेच नाहीत; शेतकऱ्यांची तक्रार

Crop Damage Survey : आपल्या केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत, अशी तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. फळ पीकविमा योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात अनेक भागांत केळी बागांचे मार्च ते जून या कालावधीत वादळी पावसात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संबधित भागात वाऱ्याचा वेगच नव्हता, नुकसान झालेले नसल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. या तक्रारी विमा कंपनीने बेदखल केल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतील, अशी स्थिती आहे.

आपल्या केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत, अशी तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. फळ पीकविमा योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण आहे. यात कमी व अधिक तापमान आणि वादळ किंवा वेगवान वारे, गारपीट आदी समस्यांत नुकसान झाल्यास परतावे मिळतात. वेगाच्या वाऱ्यात केळीबागा आडव्या होत आहेत. उष्ण वाऱ्यांत बागा होरपळल्या आहेत. अधिक वाऱ्याने बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

काही गावांत वाऱ्याचा वेग कमी होता. तर काही भागांत वाऱ्याचा वेग अधिक होता. यात विमा कंपनीला वाऱ्याचा वेग व अन्य माहिती एका खासगी कंपनीकडून प्राप्त होते. या कंपनीचे हवामान केंद्र सर्वत्र नाहीत. ८७ महसूल मंडलांत ही केंद्रे आहेत. यात काही केंद्रांभोवती झाडे, भिंती आहेत. काही केंद्रांत तापमान, वाऱ्याच्या वेगाच्या नोंदी व्यवस्थित होतात की नाही, हादेखील मुद्दा आहे.

त्यांची दुरुस्ती कोण करतो, त्याची जबाबदारी व अन्य बाबीही आहेत. अशात कमी तापमानासंबंधी अनेक महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या हंगामात परतावे मिळणार नसल्याची स्थिती आहे.

फक्त ३६ मंडलांतील शेतकरी या परताव्यांसाठी पात्र ठरले आहेत. याबाबतही अनेक शेतकऱ्यांत नाराजी आहे. कारण थंडी सर्वत्र होती, मग फक्त ३६ मंडलांतच त्याची नोंद कशी झाली, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

वादळात नुकसान भरपाईसंबंधीदेखील शेतकऱ्यांना तक्रारी होत्या. त्यावरही विमा कंपनीने कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या तक्रारी केल्यानंतर विमा कंपनी मात्र संबंधित भागात वेगाच्या वाऱ्याची नोंदच नाही तर पंचनामे व पाहणी कशी करू, अशी बतावणी करीत होते. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, लोकप्रतनिधींनी याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SBI Inflation Report : युद्ध आणि एल-निनोमुळे २०२६ मध्ये महागाई वाढेल; एसबीआयचा अहवाल

Global Transport System: हवाई, जल वाहतुकीची वैशिष्ट्ये

Farmer Training: कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन

Farmer Crying Video Viral: शेतकरी बाजारात ढसाढसा रडला, 'व्हिडिओ व्हायरल'नंतर अधिकारी निलंबित

Chana Procurement: जालना जिल्ह्यात सहा केंद्रांवरून साडेसात हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT