Bhakti Mahamarg Agrowon
ॲग्रो विशेष

Bhakti Mahamarg : भक्ती महामार्गाचे संकट टळू दे!

land Acquisition : शासनाने प्रस्तावित केलेला शेगाव- सिंदखेडराजा हा भक्ती महामार्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा असून, हजारो हेक्टर जमीन यासाठी अधिग्रहित केली जाणार आहे.

 गोपाल हागे

Buldana News : शासनाने प्रस्तावित केलेला शेगाव- सिंदखेडराजा हा भक्ती महामार्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा असून, हजारो हेक्टर जमीन यासाठी अधिग्रहित केली जाणार आहे.

यामुळे अनेक जण भूमिहीन होणार असून, या महामार्गाच्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. रविवारी (ता. २४) होळी सणानिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशाची प्रतीकात्मक होळी करीत निषेध नोंदवला.

जिल्ह्यात शेगाव-सिंदखेडराजा असा नवा भक्ती महामार्ग केला जाणार आहे. यासाठी शासनाचा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश निघाल्यापासून शेतकरी सातत्याने विरोधाचा सूर लावत आहेत. आधीच शेगाव ते सिंदखेडराजा जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. या मार्गाने केवळ २० ते २५ मिनिटे अधिक वेळ लागू शकतो.

असे असताना नवीन महामार्ग करण्याचे कारण काय, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. हा नवीन महामार्ग अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन बनवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या जमिनी रस्त्यात जाऊ नये, म्हणून शेतकरी यासाठी जिल्‍हा प्रशासन, शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी होळीच्या दिवशी सायंकाळी एकत्र येत विविध गावात महामार्गासाठी काढलेल्या शासन आदेशाची होळी करून विरोध दर्शवला.

‘इडा पिडा टळू दे भक्ती मार्गाचे संकट जळू दे’, ‘आमच्या जमिनी घेऊ नका, आम्हाला भूमिहीन करू नका’ होळीमाते सरकारला आमच्या जमिनी वाचविण्याची बुद्धी दे! अशा विविध घोषणा दिल्या. चिखली तालुक्यातील महामार्ग बाधित गावात अशी आगळीवेगळी होळी गावागावांत पेटवली गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

Livestock Breeding Policy: महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण : क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना

Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

SCROLL FOR NEXT