Electricity Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Issue : विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतेत

Team Agrowon

Pune News : गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत असताना शेतकऱ्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जगवलेली पिके आता वाचविण्याची वेळ आली आहे. दौंड तालुक्यातील बागायती पट्टा असलेले शेतकरी या धावपळीत चिंतातुर झाला आहे. यात महावितरण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. अजून दोन ते तीन महिने उन्हाळ्याची तीव्रता असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

गेल्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेती अडचणीत आली आहे. यात गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे. परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती होत आहे. यामध्ये वीज उपलब्ध नाही, असे नाही.

परंतु तांत्रिक अडचणीमुळे ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जळत आहेत. त्यामुळे पिके पाण्यावाचून होरपळत आहे. वीज मंडळ देखील सहकार्य करत आहे. परंतु अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने अधिकारी हतबल आहेत. साधारणपणे तालुक्यात राहू बेट परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने ट्रान्स्फॉर्मर, पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

महावितरण मागेल त्याला वीज जोड देण्यास तयार असताना अनेक आकडे बहादर वीज चोरी करीत आहेत. त्याचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत आहे. ओव्हर लोडिंगमुळे एखादा ट्रान्स्फॉर्मर जळल्यास त्याच्या शेजारच्या ट्रान्स्फॉर्मरवर अनधिकृतपणे आकडा टाकून वीज घेतली जाते. परंतु थोड्याच कालावधीत तो ट्रान्स्फॉर्मर देखील ओव्हर लोडिंगमुळे जळत असल्याने प्रामाणिक ग्राहकाला नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT